अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- करोना संकटात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला त्याचं कौतुक देशात झालं आहे. आता ते आजारी आहेत.(Minister Balasaheb Thorat)
अशा वेळी त्यांच्यावर टिका करु नये, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शाब्दिक टोला लागवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव राज्यातील राजकारणापासून दूर आहेत. याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
गेल्या 45 दिवसापासून राज्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही, मुख्यमंत्र्यांचा चार्ज कुणाकडे तरी द्या, हवं तर आदित्य ठाकरेंकडे द्या, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
याच मुद्द्यावरून बोलताना मंत्री थोरात यांनी पाटलांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून बोलतांना ते म्हणाले कि, विधानसभा अध्यक्षपदासाठी आम्ही काही विशेष निर्णय घेतले आहे.
लोकशाहीमध्ये विशेषतः लोकसभेत ज्या पद्धतीने अध्यक्षपदाची निवड होते ती पद्धत आम्ही स्विकारली आहे. विधानपरिषदेच्या निवडीवेळी सुद्धा अशीच पद्धत आहे. देशातील अनेक राज्यात ती पद्धत स्वीकारलेली आहे. त्यामध्ये गुप्त मतदान पद्धत नाही. सोमवारी ही निवडणूक जाहीर होईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम