Big Breaking : श्री क्षेत्र भीमाशंकर कडे जाणाऱ्या घोडेगाव भीमाशंकर रस्त्यावरील पिंपळगाव जवळील बोडकी येथे नदीकाठचा रस्ता खचल्यामुळे भीमाशंकर कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूने वाहतुक सुरु आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे वर्षभरात लाखो संख्येने भाविक व पर्यटक येतात. वर्षभर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ चालू असते. आधिक महिना असल्याने भीमाशंकरला मोठी वर्दळ होत आहे. तर पुढच्या महिन्यात श्रावण महिना आल्याने भाविकांची गर्दी होणार आहे.
अशातच पिंपळगावच्या पुढे असणाऱ्या बोडकी या ठिकाणी संरक्षण भिंत तसेच मोऱ्यांचे बांधकाम चालू असून हे काम नदीपात्रातून अंदाजे ६० ते ७० फूट उंचीवर रस्त्यापर्यंत करण्याचे सुरु असून या रस्त्याच्या कडेपासून खोदल्यामुळे रस्त्याचा काही भाग खचला असल्याने सध्या एका बाजूने वाहतूक चालू असून येणाऱ्या श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. राहिलेल्या रस्त्याचा भाग खचल्यास भीमाशंकर कडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद होणार आहे.
या कामासाठी क्षमतेपेक्षा लहान पाईप वापरले गेले आहेत. तसेच भिंतीच्या धराच्या मातीचे कोणतेही परीक्षण न करता संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले असून धराचा स्तर खचला तर संरक्षण भिंत पडण्याची शक्यता आहे. भिंतीला वापरण्यात येणारे कॉक्रिट शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे वाटत नाही तरी त्याचे तांत्रिक परीक्षण व्हावे. संबंधित कामाची गुण नियंत्रक विभागाकडून तपासणी होऊन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
भीमाशंकर येथे जाणाऱ्या भाविकांना शिनोली येथील रस्ता खचल्यामुळे मनस्ताप होत असून याला ठेकेदार जबाबदार आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांमुळे सार्वजनिक बांधकाम खाते विभाग बदनाम झालेले आहे. अशा ठेकेदारांची कामे गुण नियंत्रण विभागाकडून किंवा त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करून त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले पाहिजे. – अमोल काळे, शिवसेना तालकाप्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष