व्याजापोटी ओढून नेलेली स्कॉर्पिओ अखेर पोलिसांमुळे मिळाली परत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- व्याजापोटी दुरगाव येथील विटभट्टी चालकाची स्कॉर्पिओ सावकाराने बळजबरीने ओढून नेल्याची घटना घडली होती.

आता ही स्कॉर्पिओ कर्जत पोलिसांनी सावकाराकडून जप्त करत ती संबंधित तक्रारदाराच्या ताब्यात दिली आहे. आजीम नशिर शेख (रा.दुरगाव ता.कर्जत) यांनी दि.३ एप्रिल २०१५ रोजी विटभट्टी व्यवसायासाठी दुरगाव येथील खाजगी सावकाराकडून याच्याकडुन ५ लाख रुपये ६ रु. टक्के व्याजदराने घेतले होते.

त्यानंतर पुढील वर्षी व्याजापोटी दि.३ एप्रिल २०१६ रोजी १ लाख ५० हजार सावकाराला दिले.त्यानंतर दि.३ एप्रिल २०१७ रोजी ५ लाख मुद्दल व १ लाख व्याज असे एकूण ६ लाख रुपये सावकाराच्या बँक खात्यावर आर.टी.जी.एस केले होते.

एवढी रक्कम देऊनही ‘तुमच्याकडे अजुन ४ लाख ७० हजार रुपये व्याज शिल्लक राहिले आहे’ असे सावकाराने सांगितले. ही रक्कम आत्ता लगेच दिली नाही तर या एकमेवर ६ टक्के दराने व्याज आकारले जाईल असेही सांगितले.

त्यानंतर २ वर्षांनी तक्रारदार शेख यांनी दि.३ एप्रिल २०१९ रोजी सावकाराला ४ लाख ७० हजार रुपये दिले होते.एवढी मोठी रक्कम देऊनही सावकाराची भुक भागली नाही.’तुमच्या व्याजाचे व्याज ५ लाख ४५ हजार २०० रु.शिल्लक राहिले असून तुम्हाला आमचे पुर्ण पैसे देता येत नाहीत व तुम्ही आमचे व्याजाचे पैसे परत करू शकत नाही.

तुमच्याकडे किती वेळा हेलपाटे मारायचे? तुमची एम.एच १४ जी एच २२०६ ही स्कॉर्पिओ गाडी आम्ही घेऊन जात आहे.जोपर्यंत तुम्ही व्याजाचे संपुर्ण पैसे देत नाही तोपर्यंत ही गाडी आमच्याकडेच राहील असे म्हणत सप्टेंबर २०२० रोजी ही गाडी सावकारांनी बळजबरीने ओढून नेली होती .

‘मी आज ना उद्या तुमचे पैसे देईन पण माझी गाडी ओढून नेऊ नका अशी तक्रारदाराने दोघांनाही विनंती केली होती.

त्यानंतर वेळोवेळी गाडी माघारी मागितली पण ‘आता ५ लाख ४५ हजार २०० रुपयांचे १० लाख रुपये झाले आहेत,तुम्ही आता १० लाख द्या मग काय ते पाहू’ असेच सांगण्यात येत होते.

विशेष म्हणजे ही गाडी आजतागायत सावकाराच्याच ताब्यात होती.त्यानंतर या खाजगी सावकारांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कर्जत पोलिसांमुळे ही गाडी आता तक्रारदार आजीम शेख यांना मिळाली असुन त्यांनी कर्जत पोलिसांचे आभार मानले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,

उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाट, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते, भाऊ काळे, गणेश भागडे, संपत शिंदे, मनोज लातूरकर यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!