नगर जिल्ह्याचे तत्कालीन एसपी सौरभ त्रिपाठींचा पोलिसांकडून शोध सुरु… ‘हे’ आहे कारण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar News:- अंगडिया वसुली प्रकरणात आयपीएस अधिकारी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी महिन्याला १० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप अंगडिया असोसिएशनने केला होता.

याच प्रकरणात तीन पोलिसांच्या अटकेपाठोपाठ पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीचाही पाहिजे आरोपीमध्ये समावेश करण्यात आला.

गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके त्यांच्या शोधासाठी मुंबईबाहेर गेली आहेत. मूळचे कानपूर येथील असलेले रहिवासी त्रिपाठी २०१०च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर मुंबईत वाहतूक शाखेत नियुक्ती झाली. त्यामात्र, अंगडिया वसुलीप्रकरण अंगलट आले आणि त्यांची बदली करण्यात आली. मात्र, त्यानंतर वैद्यकीय रजेवर जात ते नॉट रिचेबल झाले. पैशांची बॅग घेऊन निघालेल्या अंगडियांना आयकर विभागाची भीती घालून वसुली करणाऱ्या एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्या विरोधात १९ फेब्रुवारी रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपासासाठी हा गुन्हा सीआययूकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात कदम आणि जमदाडे व पोलीस निरीक्षक ओम वंगाटेलाही अटक करण्यात आली.

नेमके प्रकरण काय आहे? सौरभ त्रिपाठी हे या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त असताना आंगडाई व्यावसायिकाना धाक दाखवून त्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचे प्रकार सुरु होते.

हे प्रकरण उजेडात आल्यानंतर त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतरही त्रिपाठी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

मात्र वंगाटे यांच्या चौकशीतून त्रिपाठी यांनीच आगडिया व्यावसायिकाकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe