अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात सध्या अनेक लुटीच्या घटना घडत आहे. तसेच चोरी, गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येत आहे. असे असताना सुरक्षा अत्यंत महत्वाचा विषय बनलेला असताना देखील शहरातील एका बँकेची सुरक्षा हि वाऱ्यावर असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणार्या जिल्हा सहकारी बँकेची सुरक्षा वार्यावर सोडण्यात आली आहे. बँकेत बंदूकधारी सुरक्षा रक्षकाऐवजी बॉऊन्सरचा बंदोबस्त लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या बाहेर शनिवारी (दि.20 नोव्हेंबर) बॉऊन्सर सुरक्षा रक्षक म्हणून उभा करण्यात आला होता. वास्तविक पाहता रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बँकांमध्ये अधिकृत परवानाधारक बंदुकधारी सुरक्षा रक्षक नेमणे बंधनकारक आहे.
मात्र, जिल्हा बँकेच्या सुरक्षेसाठी ठेका दिलेल्या खासगी ठेकेदाराने तसे न करता बाऊन्सरच्या हातात बँकेची सुरक्षा सोपवली आहे. जिल्हा बँकेत कोट्यवधी रुपयांचा व्यवहार दररोज होत असतो.
सध्या एटीएम फोडणे, रोकड लांबविणे अशा घटना घडत असताना जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बँक असलेल्या जिल्हा बँकेची सुरक्षा वार्यावर सोडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यंदा कदाचित काही अनुचित प्रकार घडल्यास याची मोठी आर्थिक किंमत बँकेला मोजावी लागण्याची शक्यता आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम