अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-मोटार सायकलवरून घरी चाललेल्या दोघा मेंढपाळांना रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने मारहाण करत ५० हजारांची रोकड व १२ हजार रुपये किमतीचे मेंढ्यांचे केस कापण्याचे मशिन असा ६२ हजार रुपयांना लुटल्याची घटना नगर तालुक्यातील नांदगाव शिवारात घडली.
याबाबत कृष्णा भाऊसाहेब सरक (रा. कोळपे आखाडा, नांदगाव शिवार, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कृष्णा सरक व त्याचा आतेभाऊ गोरख कोळपे हे दोघे गुरुवारी (११ नोव्हेंबर) रात्री ८.४५ च्या सुमारास मोटारसायकलवरून कोळपे आखाडा येथे जात असताना नांदगाव शिवारात बिरोबा मंदिरासमोर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात तीन इसमांनी त्यांना अडवले.
त्यातील एकाने गोरख कोळपे यास लोखंडी रॉडने हातावर व पायावर मारहाण करीत जखमी केले. इतर दोघांनी कृष्णा सरक यांच्या खिशातील ५० हजारांची रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच त्यांच्या जवळ असलेले मेंढ्याचे केस कापण्याचे मशिन असलेले सुटकेस हिसकावून घेत पोबारा केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम