अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ मंदिरातील चोरीची उकल !

Published on -

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्री संत सावता महाराज मंदिरात चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांचे गुन्हे उघडकीस आणून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मद्देमाल जप्त करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.

दि. २ डिसेंबर २०२३ रोजी पिंपळगाव माळवी ता., जि. अहमदनगर येथील श्री. संत सावता महाराज मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या डोक्यातील मुकुट व रुक्मिणीच्या गळ्यातील मणीमंगळ सुत्रातील सोन्याचे ४ मणी, असा ६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची फिर्याद दि.३ डिसेंबर रोजी श्रीकृष्ण बबन रायकर, रा. पिंपळगाव माळवी, ता. जि. अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल केली होती.

त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा राहुल नानासाहेब शिंदे व कुणाल विजय बनसोडे दोघे (रा. वडगाव गुप्ता, ता.जि अहमदनगर) यांनी कला असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली.

सानप यांनी पोलिसांचे एक पथक वडगाव गुप्ता येथे पाठविले. पथकाने वडगाव गुप्ता येथून आरोपींना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडे एक नटराज देवताची मूर्ती मिळून आली. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

एमआयडीसी पोलिसांच्या कार्याचे कौतुक

एमआयडीसी पोलिसांनी सपोनि राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. रोडरोमिओंचा बंदोबस्त, इमामपूर येथील अपहरण प्रकरणातील खुनाच्या गुन्ह्याची उकल, चोरीच्या प्रकरणांचा तपास, नागापुर येथे फिल्मी स्टाईलने गावठी कड्यांसह आरोपींना अटक तसेच अवैध धंद्यांवर दहशत निर्माण करण्यात एमआयडीसी पोलीस यशस्वी झाले आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या या कामगिरीबद्दल जेऊर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News