Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील प्रगतशिल शेतकरी व माजी सरपंच विक्रम पाटील लोढे यांचा मुलगा अविनाश लोढे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत महाराष्ट्रामध्ये २५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन क्लासवन अधिकारी या पदावर निवड झाली आहे.
या यशाबद्दल त्यांचा बालमटाकळी येथे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अविनाश पाटील लोढे म्हणाले की, जिद्दीने आणि हिमतीने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो,

या यशामागे माझ्या आई-वडील, नातेवाईक व मामांचे आशीर्वाद, प्रेम व साथ मिळाल्याने मी क्लासवन अधिकारी झालो आहे. पदाच्या माध्यमातून मी नेहमी दीन- दुबळ्यांची सेवा करील.
या वेळी साध्वी हभप शीतल देशमुख, राहुल गरड, रामेश्वर महाराज देशमुख, विक्रम लोढे, बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, सरपंच डॉ. रामजी बामदळे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, ज्ञानेश्वरचे माजी संचालक मोहनराव देशमुख, रोहन राजपुरे, सेवा संस्थेचे चेअरमन माणिकराव शिंदे,
माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनराव काकडे, कमुभाई शेख, ज्ञानेश्वरचे माजी संचालक चंद्रकांत गरड, सेवा संस्थेचे माजी उपाअध्यक्ष रतनराव देशमुख, विठ्ठल देशमुख, भानुदास गलधर, पत्रकार जयप्रकाश बागडे, बाबासाहेब भाकरे, हरिश्चंद्र घाडगे, विक्रम बारवकर, मधुकर पाटेकर, अशोक खिळे, प्रशांत देशमुख, संदिप देशमुख,
हरिश्चंद्र राजपुरे, बाबासाहेब देशमुख, अशोक वैद्य, भारत घोरपडे, गणेश शिंदे, भाऊसाहेब बामदळे, रोहिदास भोंगळे, रोशन बागडे, श्रीकांत राजपुरे, दिगंबर टोके, राम तांबे, बाबा गरड, योगेश दोडके, संदिप शिंदे, राजुदादा राजपुरे, संभाजी तिडके, राजेंद्र ढमढेरे पाटील, परमेश्वर शिंदे, बबनराव लोणकर आदी उपस्थित होते.













