अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये शासकीय रुग्णालयात आग लागल्याची घटना ताजी असताना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहरात अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे.
भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. या घटनेत चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अनेक मुले जखमी झाली आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्ववीट करून या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. युद्ध पातळीवर चाललेल्या बचावकार्यामुळे आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
मात्र, या आगीत चार मुलांचा होरपळून मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले अनेक मुले या आगीत गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
तसेचचौहान म्हणाले की, भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये झालेली आगीची घटना दुःखद आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मोहम्मद सुलेमान हे याचा तपास करणार आहेत. या घटनेनंतर कुटुंबीय आपल्या मुलांच्या शोधात रुग्णालयाबाहेर दिसत होते.
हॉस्पिटलमध्ये आग नेमकी कशी लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे पथक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम