जसा पाण्याशिवाय मासा तडफडतो, तशी सत्तेविना भाजपची अवस्था: आमदार लंके

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- सध्या राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलेच टिकायुद्ध रंगल्याचे पाहायवयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत.

यात आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उडी घेतली असून, भाजप सत्तेविना पाण्याबाहेरील माशा सारखा अस्वस्थ झाला आहे. अशा शब्दात लंके यांनी भाजपवर टीका केली आहे.

आमदार लंके हे शिर्डी येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘जसा पाण्याशिवाय मासा तडफडतो, तशी सत्तेविना भाजपची अवस्था झाली आहे.

आरोप, प्रत्यारोप, ईडीचा धाक दाखवणे हा केंद्रातील सत्तेचा गैरवापर असून भाजपची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरू आहे,’ पुढे बोलताना लंके म्हणाले की, राजकारणात यश आणि अपयश येतच असतात.

अपयश आल्यानंतर आपण आपल्या चुका शोधायच्या असतात. आपण जनतेची सेवा करण्यात कुठे कमी पडलो? त्याचा पुनर्विचार करून त्यात सुधारणा करायला हवी.

आमचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आले. विरोधकांनी आपल्याला अपयश आले या भावनेने शांत राहिले पाहिजे.

मात्र तसं होताना दिसत नाही. जसा पाण्याविना मासा तडफडतो तशी सत्तेविना भाजपची अवस्था झाली असून केंद्रातील सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप लंके यांनी केला आहे.

दरम्यान कार्यक्रम आटोपल्यांनंतर लंके यांनी एका कार्यकर्त्याच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी राहाता येथील बाजारपेठेत व्यावसायिकांसह अनेकांनी भेट घेतली.

तसेच लंके यांनी सर्वांसोबत मनमुराद गप्पा मारल्या. व्यवसायाने टेलर असलेल्या अमोल चौधरी या एका चाहत्याने तर अवघ्या २० मिनिटात शर्ट शिवून तो लंके यांना भेट दिला. मतदारसंघाच्या बाहेर देखील एवढे प्रेम मिळत असल्याने भारावून गेल्याचं लंके यांनी सांगितलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News