अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- राज्यभर गाजलेल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची सुनावणी सोमवार (04 ऑक्टोबर) रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.
याप्रकरणी सरकार पक्षातर्फे आपण बाजू मांडणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी दिली. राज्यासह देशभर ज्या प्रकरणाने संतापाची लाट तयार केली.
महिला अत्याचाराच्या विरोधात जनता एकटावलीअशी कोपर्डी येथील अत्याचार व खून प्रकरणाने महाराष्ट्र राज्य ढवळून निघाले होते. दरम्यान कोपर्डी येथील अत्याचार आणि खून प्रकरणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने तीनही आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
सदर फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरण्यासाठी राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठ येथे फाशी निश्चितीकरणाचा अर्ज दाखल केला होता. त्याचप्रमाणे, यातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ याने फाशीच्या शिक्षेच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते.
आरोपी भवाळ याने मुंबई उच्च न्यायालय येथे स्वतंत्र याचिका दाखल करून सदर संपूर्ण प्रकरण औरंगाबादहुन मुंबईला वर्ग करण्यासंबंधी विनंती केली होती.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये फाशीच्या शिक्षेविरूद्ध अपील दाखल केली आहेत. या तिन्ही प्रकरणाची त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अपिलाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम