Ahmednagar News : वाहनचालकांचा संप चिघळला ! अहमदनगरमध्ये ‘राडा’, ट्रक चालकांच्या तोंडाल काळे, चपलांचा हार..पोलिसांकडून लाठीचार्ज

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र शासनाने हिट अँड रन कायदा केल्यानंतर याविरोधात वाहनचालकांनी मोठा संप पुकारत आंदोलने केली. सध्या अहमदनगर जिल्ह्यातही अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्यावतीने आंदोलन सुरु आहे.

हिट अँड रन कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलन कर्त्यांची आहे. त्यासाठी नगर शहरातील फलटण पोलिस चौकी कोठला येथे आंदोलन सुरु असताना हे आंदोलन चिघळले.

आंदोलनकर्त्यांनी सुरु असलेल्या वाहनांवर हल्ला करत वाहन चालकांना काळे फासले, तसेच चालकांना चपलांचा हार घातला. दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्यावतीने फलटण पोलिस चौकी कोठला येथून शहरातील सर्व ड्रायव्हर एकत्र येऊन केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. तसेच कोठला परिसरात आंदोलन सुरु होते. यावेळी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान गुरुवारी सकाळी आंदोलन कर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सुरु असलेल्या वाहनांवर हल्ला करत वाहन चालकांच्या तोंडाला काळे फासले. तसेच चालकांच्या गळ्यात चपलांचे हार घालण्यात आले. वाहनांच्या काचाला काळे फासले, वाहनाच्या हवा सोडण्यात आल्या. दरम्यान घटनेची माहिती समजताच तोफखाना, कोतवाली, भिंगार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिट अँड रन कायदा रद्द व्हावा अशी वाहनचालकांची मागणी असून मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. शांततेत हे आंदोलन सुरु आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यात हे वातावरण चिघळले दिसले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe