सावित्रीबाई फुलेंच्या वेशभुषेत आलेल्या विद्यार्थिनींनी वेधले लक्ष

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-भिंगार शहर फुले ब्रिगेड व भाजपच्या वतीने स्नेहालय संचलित भिंगारच्या ऊर्जा बाल भवनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षिका दिवस म्हणून साजरी करण्यात आला.

बालभवनच्या माध्यमातून वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या धडे देणार्‍या महिला शिक्षकांना सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.

भिंगार शहर फुले ब्रिगेड अध्यक्ष व भाजप उपाध्यक्ष संतोष हजारे यांच्या यांच्या पुढाकाराने ऊर्जा बाल भवनात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी बालभवनच्या प्रकल्प अधिकारी शबाना शेख, ऊर्जा बालभवनचे शिक्षिका निलोफर शेख, गुलनाज सय्यद, सुकन्या नायडू, अंजुम शेख, निकिता गवळी आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुलेंच्या वेशभुषा परिधान करुन कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधले. संतोष हजारे म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान व त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

ही गरज ओळखून सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा घेण्यात आलेल्या निर्णयाचे स्वागतार्ह आहे.

समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी अन्नधान्य पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली फुले ब्रिगेडच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment