मातृ-पितृछत्र हरलेल्या दिपकला फुंदे दाम्पत्यांचा आधार

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-काही दिवसापुर्वी एक फोन आला अन दिपक ची माहिती मिळाली,त्याच्यासह आम्हालाही भेटीची ओढ लागली…दिपक घरी आला.

बीड जिल्ह्यातील दुष्काळी गावातला दिपक बारावीत असतांना दोन वर्षापुर्वी वडीलांच निधन झाल, घरातील कमवती व्यक्ती गेली. वडील कुठे गेले हे न समजणारी चिमुकली बहीणच्या संगोपनासह डोंगराएवढ्या दुःखातून सावरत असतांना एका जीवघेण्या असाध्य आजाराने घेरलेली आई अन दिपक एकमेकांना कसाबसा आधार देत सावरत असतांनाच

आठ दहा महिन्यापुर्वी नियतीने घाला घातला अन दिपकच उरलसुरल मातृछत्रही हरपलं स्पर्धा परिक्षेतून अधिकारी होण्याच स्वप्न पाहत धिरोदात्त दिपक आता मात्र गावाकडे असून नसल्यासारखी शेती आई-वडिलांच्या आजारपणानं झालेली आर्थिक कोंडी यामुळे नियतीपुढे अक्षरशः गुडघे टेकून हाताश झाला होता

तासभरात त्याची कथा अन व्यथा ऐकतांना अनेकदा अश्रू अनावर झाले.आज शिक्षणासोबत दिपकच्या पोटाचा मोठा प्रश्‍न आहे वाढत्या वयातील लेकरांना दिवसभरात अनेकदा भूक लागते,भूकेलेला चेहरा पाहून काहीतरी खायला देणारी आई राहीली नाही गेले काही महिने अर्ध भाजल अर्ध कच्च अस हाताने करुन तर कधी मिळेल ते खाणारा दिपक पुस्तकाच्या सहवासात भूक नाही लागत सर हे बोलतांना खूप गहिवरला.

त्याला धीर देताना कोणतीही ही चर्चा न करता अनुराधा आणि मी केवळ डोळ्यांच्या भाषेने एकमेकांच्या मनातल जाणून दिपकच्या स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नपुर्तीसाठी आवश्यक त्या पुस्तकांसह त्याच्या राहण्या खाण्याची काळजी अन जबाबदारी घेण्याच ठरवत सेवाश्रय ने दिपकला आश्रय देवून त्याच मातृत्व स्विकारलं…

जून मध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिपकला पुण्याला जायच आहे आम्ही घेतलेल्या जबाबदारीच कौतुक करत अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षेत नावलौकिक असलेली पार्थ अ‍ॅकॅ डमी अभ्यासिकेचे संचालक आदरणीय आंधळे मेजर यांनी मे महिन्यांपर्यंत विनामूल्य प्रवेश दिला.

सेवाश्रय फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.अनुराधा फुंदे यांचे वतीने दिपकला राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेच्या खर्चासाठी मदतीचा दहा हजार रुपयांचा धनादेश पाथर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक मा.बंडूपाटील बोरुडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सेवाश्रयच्या माध्यमातून अनाथ, निराधार विधवा भगिणींंसांठी करत असलेल्या कार्यामुळे फुंदे दाम्पत्याच सर्वत्र कौतुक होत आहे.