राहुरी फॅक्टरी येथील ‘ते’ उद्यान बनले प्रेमीयुगलांचा अड्डा

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar News :- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत भागातील कल्पना चावला उद्यान प्रेमीयुगलांचा अड्डा बनला असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळते आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी असलेले हे उद्यान विद्रुप करण्याचे काम काही अतिउत्साही प्रेमी टोळ्यांकडून केले जात आहेत.

यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी अदिनाथ वसाहत येथे कल्पना चावला उद्यान उभारले आहे.

मात्र हे उद्यान प्रेमी युगलांचा अड्डा बनला असल्याने स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. प्रेमी गुगल जोडप्यांच्या आडोशाची केंद्रे बनलेले कल्पना चावला उद्यान भागात नागरी वसाहत आहे.

त्यामुळे ठिकाणी देवळाली प्रवरा नगरपालिकेने निदान सीसीटीव्ही लावावेत अशी मागणी होत आहे. प्रेमींयुगल येथे बसत असल्याने त्यांच्या लीला पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांची देखील कुचंबणा होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe