भाविकांसाठी श्रीक्षेत्र देवगड येथील मंदिरे झाली खुली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- राज्यात घटस्थापनेपासून धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहे. त्याचा अनुषंगाने नगर जिल्ह्यातील देखील अनेक धार्मिक स्थळांचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले आहे.

यातच श्रीक्षेत्र देवगड मंदिरे देखील खुले झाले आहे.नुकतेच शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंदिर खुले झाल्यानंतर श्रीक्षेत्र देवगड येथील मंदिरांमध्ये दर्शन घेतले. त्यानंतर भास्करगिरी महाराजांचे दर्शन घेऊन चर्चा केली.

दरम्यान देवगड देवस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्याहस्ते सकाळी घंटानाद करत तसेच देवाचा गजर करत भगवान दत्तात्रेयांचे मंदिर, किसनगिरी बाबा समाधी मंदिर व इतर सर्व मंदिरे उघडण्यात आली. देवगड येथे दररोज पाच हजार भाविकांना कोविड नियमांचे पालन करत दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती महंत भास्करगिरी महाराज यांनी दिली.

याप्रसंगी भास्करगिरी महाराज म्हणाले, भगवंताने करोना या आजाराचे जगभरातून उच्चाटन करावे सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे खुली होत आहे यांचा आनंद होत आहे. सर्व शासकीय नियम पाळून भाविक दर्शनाचा मानसिक आनंद घेत आहेत. आज जगदंबा नवरात्र उत्सव सुरू होत आहे देवी-देवतांच्या कृपेने या महामारीचे उच्चाटन होवो अशी प्रार्थना केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News