वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करणारे तिघे सराईत गजाआड

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले.

अजय छंदु काळे (वय १९ रा. पढेगाव, ता. कोपरगाव), अमित कागद चव्हाण (वय २० रा. हिंगणी, हल्ली रा. पढेगाव ता. कोपरगाव) व जंतेश छंदु काळे (वय २२ रा. पढेगाव ता. कोपरगाव) अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

३० मे, २०२२ ते १ जून, २०२२ दरम्यान रात्रीचे वेळी घराचे छतावर प्रवेश करून झोपेत असलेल्या राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय ६५) व दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय ७५) अशा दोघांची अज्ञात हत्याराने खून करुन, घरातील कपाटाची उचकापाचक करून एक लाख ९० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरी चोरी करुन चोरुन नेले होते.

याप्रकरणी जालिंदर दत्तात्रय भुजाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटना ठिकाणास भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे निरीक्षक कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तीन विशेष पथके नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे संयुक्त पथक तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती प्राप्त करुन शोध घेत असताना पथकास माहिती मिळाली. सदरील गुन्हा हा अजय काळे याने त्याचे साथीदारासह केला असून तो त्याचे राहते घरी आहे, पोलीस पथक तात्काळ पढेगाव येथे जाऊन आरोपी अजय काळे याचे वास्तव्याबाबत माहिती घेत असताना एक इसम पोलीसांची चाहुल लागताच पळन जाऊ लागला पथकातील अंमलदार यांनी संशयीत इसमाचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय छंदु काळे असे असल्याचे सांगितले.

त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी असता त्याचे साथीदार अमित कागद चव्हाण, जंतेश छंदु काळे अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. माहिती नुसार आरोपी अमित चव्हाण व जंतेश काळे यांचा त्यांचे राहते घरी जावून शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेत अटक केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe