अहमदनगरमध्ये फरार आरोपींचा थरार ! भर दुपारी रस्त्यावर तरुणावर कोयत्याने वार, गोळीही झाडली..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. कायद्याचा धाकच राहिला नाही असे वाटावे इतपत भयानक घटना मागील काही दिवसांत नगर शहरात घडताहेत. आता काल (दि.१६) नगर शहरातील बोल्हेगाव फाटा येथे मोठा थरार घडला.

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींनी तरुणावर कोयत्याने भरदुपारी वार केले. गावठी कट्टयातून गोळी झाडली. गोळी राऊंडमध्येच अडकल्याने मोठा अनर्थ टळला. शाम प्रदीप कदम (रा. बोल्हेगाव, सावेडी) असे

हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून भोऱ्या भिंगारदिवे (वय १९) व संतोष धोत्रे (३०, दोघे रा. नागापूर चर्चजवळ, नागापूर) असे आरोपींची नावे आहेत. ही घटना बोल्हेगाव फाटा येथे घडली.

काल शनिवारी दुपारी दोन्ही आरोपी व कदम हे बोल्हेगाव फाटा येथे समारोसमोर आले होते. त्यावेळी आरोपींनी कदम याच्याशी वाद घातला. धारदार कोयत्याने कदमच्या डोक्यात व पाठीत सपासप वार केले.

कदम या हल्ल्यात रक्तबंबाळ झाला. येईल एका आरोपीने तर गोळीही झाडली. परंतु गोळी राऊंडमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

पोलिसांनी पाहिले, गर्दीत घुसले, अन..

हा हाणामारीचा भयंकर थरार सुरु असताना तेथून एमआयडीसी पोलिस दुसऱ्या आरोपींना घेऊन न्यायालयात चालले होते. पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. पोलिसांनी गर्दीत घुसून भांडण थांबविले व मोठा अनर्थ टळला.

भर चौकात हा थरार सुरू असताना पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले. एक गावठी कट्टा, धारदार कोयता, अशी शस्त्रे जप्त केली. कदम हे हल्ल्यात जखमी झाले होते त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या आधीही झाला आहे हल्ला

शाम कदम यांचे बोल्हेगाव येथे एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये ते व त्यांचा भाऊ अमोल दिवाळीच्या दिवशी रात्री पूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी संतोष धोत्रे व भिंगारदिवे याच्यासह इतर सहाजण आले.

त्यांनी अमोल यास शिवीगाळ करीत मारहाण केली. हॉटेलवर दगडफेक केली होती. याबाबत १४ नोंव्हेंबरला अमोल कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष धोत्रे व भोया भिंगारदिवे हे फरार होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe