श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा गाडा यापुढेही थांबणार नाही – आ.लहू कानडे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा केला. तरुणांसाठी नोकरी मेळावा घेऊन सुमारे ११०० तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. अतिवृष्टीच्या मदतीसाठी आंदोलन केल्याने मदत मिळाली.

विम्याच्या २५ टक्के अग्रीम मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. सरकारकडे पाठपुरावा केल्याने श्रीरामपूर तालुका दुष्काळी यादीत आला आहे. तालुक्याच्या विकासाचा गाडा यापुढेही थांबणार नाही, असे आश्वासन आ.लहू कानडे यांनी दिले.

तालुक्यातील भैरवनाथनगर एका कार्यक्रमात आ.कानडे बोलत होते. आ. कानडे पुढे म्हणाले, दीड ते दोन वर्षांपूर्वी या रस्त्यांची कामे मंजूर झाली होती. परंतु सरकार बदलल्यानंतर सुमारे ५८ कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली.

त्यानंतर आपण न्यायालयात गेलो. विधानसभेत पाठपुरावा केला. ही कामे जनतेची आहेत. त्यामुळे या कामांची स्थगिती उठविण्यात यावी, असा आग्रह धरला.

न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिल्याने सरकारला स्थगिती उठवावी लागली. तेव्हा आता कुठे कामे सुरु झाली. ही कामे दर्जेदार कसे होतील, यासाठी आपला प्रयत्न असतो. रस्त्यांवर किती थर असतात हे तालुक्यातील जनतेला आता समजू लागले आहे.

यावेळी प्रवीण फरगडे, महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव फरगडे, भारत तुपे, बाळासाहेब दिघे यांनी मनोगतातून आ. कानडे यांनी केलेल्या विकास कामाचे विशेष कौतुक केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe