गावठी विकायला आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अवैध गावठी कट्टे विक्रीसाठी एकजण औरंगाबादहून नगरकडे येत असलेल्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ४ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादकडून अहमदनगरकडे शेंडी बायपास व पांढरीपूल परिसरात एकजण गावठी कट्टे व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कटके यांना मिळाली.

त्यानुसार कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकापथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेंडी बायपास, पांढरीपुल येथे सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर एकजण औरंगाबादकडून अहमदनगरकडे येताना दिसला.

पथकाची खात्री झाल्याने अधिकारी व अंमलदार यांनी त्यास हात दाखवून थांबण्याची सूचना केला असता त्याने मोटरसायकल जोराने चालून शंेडी बायपास रोडने पळून जाऊ लागला, दरम्यान समोरून आलेल्या ट्रकमुळे त्याया मोटरसायकलचा स्पीड कमी झाल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

त्याची अधिक चौकशी केली असता त्याचे नाव महेश काशिनाथ काळे (वय २६ वर्ष रा.जामगाव ता .गंगापूर जि.औरंगाबाद) असे असल्याचे सांगितले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे ४ गावठी बनावटीचे कट्टे, ८ जिवंत काडतूस आढळून आल्याने सदर बाबत पोहेकॉ / संदीप पवार यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या

फिर्यादीवरून त्याच्यावर आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील आरोपी महेश काशिनाथ काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा,खुनाच्या प्रयत्नासह गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe