अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- कोरोना संसर्गामुळे बंद असलेला करंजी येथील आठवडे बाजार तब्बल आठ महिन्यांतर मंगळवारी पुन्हा एकदा सुरू झाला. आठवडे बाजाराला करंजीसह वाड्यावस्त्यांवरील भाजी विक्रेत्यांसह भाजी खरेदी करणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
ग्रामपंचायतने आवाहन केल्याप्रमाणे बहुतांश लोकांनी बाजारात येताना मास्कचा वापर केल्याचे समाधान व्यक्त करत भाजी विक्रेत्यांसाठी जागेची आदल्या दिवसीच साफसफाई करून
भाजी विक्रेत्यांच्या जागेचे योग्य नियोजन सरपंच बाळासाहेब अकोलकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने केल्याची माहिती उपसरपंच दयाबाई क्षेत्रे यांनी दिली.
दर मंगळवारी करंजी येथे आठवडे बाजार भरतो. मात्र ,गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे हा आठवडे बाजार प्रशासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved