Ahmednagar News | पुणतांब्यात पुन्हा घुमला शेतकऱ्यांचा आवाज

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : आजपासून पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ते पाच जूनपर्यंत सुरू राहणार आहे. आज सकाळी गावातून शेतकऱ्यांची रॅली काढण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर गावातील शेतकरी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. सकाळी शेतकऱ्यांनी गावातून दिंडी काढली. यावेळी २०१७ मध्ये याच गावातून झालेल्या पहिल्या शेतकरी संपाच्या आठवणी जाग्या झाल्या.

दिंडी शेतकरी पुतळ्याजवळ आली. तेथे शेतकरी पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ५ जूनपर्यंत दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत धरणे आंदोलन केले जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe