गोळ्याचे कारण सांगून मोटारसायकल घेऊन वेटर झाला फरार ; नगर जिल्ह्यातील घटना

Pragati
Published:

Ahmednagar News : मेडिकल मधुन गोळ्या घेवुन येतो, थोडा वेळ मोटरसायकल द्या. असे सांगून एकाची मोटारसायकल घेऊन मेडिकलमध्ये गेलेला एक वेटर फरार झाला आहे. हि घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडली आहे .

रामेश्वर खिल्लारे असे त्या वेटरचे नाव असून नवनाथ भानुदास कटारे असे मोटारसायकल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी कटारे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून यात म्हटले आहे कि, नवनाथ कटारे यांच्याकडे होंडा कंपनीची शाईन मॉडेलची (एमएच १७ सी एस ५३१६) असा नंबर असलेली मोटारसायकल आहे.
राहुरी ते शिंगणापुर रोडवर ब्राम्हणी येथे हॉटेल शेतकरी या नावाने हॉटेल आहे. सदर हॉटेलवर रामेश्वर सिताराम खिल्लारे हा वेटर म्हणुन काम करतो.

नवनाथ कटारे हे त्या हाँटेलवर सतत जात येत असल्याने त्यांची. व रामेश्वर याची ओळख झाली. नवनाथ कटारे हे त्यांची मोटारसायकल घेऊन हॉटेल शेतकरी येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी मोटारसायकल हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावली होती.

त्यानंतर काही वेळात हॉटेलवर काम करणारा वेटर रामेश्वर सिताराम खिल्लारे हा नवनाथ कटारे यांना म्हणाला की, मला थोडा वेळ तुमची मोटारसायकल द्या, मी गावातुन मेडिकलमधुन गोळ्या घेवुन येतो.

तेव्हा नवनाथ कटारे यांनी त्याला मोटारसायकल दिली. त्यानंतर आरोपी रामेश्वर खिल्लारे हा मोटारसायकल घेवुन पसार
झाला. नवनाथ कटारे यांनी त्याचा शोध घेतला.

मात्र तो मिळुन आला नाही. या फिर्यादीवरून आरोपी रामेश्वर सिताराम खिल्लारे ( रा. जामठी, ता. सोनगाव, जि. हिंगोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe