जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या ‘या’ धरणातून आवर्तन सुटले; तब्बल २७ दिवस राहणार पाणी

Sushant Kulkarni
Published:

Ahilyanagar News: कर्जत तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निमगाव गांगर्डा येथील सिना धरणातुन आवर्तन सोडण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भाग तसा दुष्काळीच मात्र त्यात काही भागात उत्तरेच्या धरणाच्या पाण्यामुळे त्या भागात शेती समृद्ध झाली.

मात्र इतर भाग अद्याप कोरडा आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरणातून रब्बी हंगामाकरिता मंगळवारी दि.१८ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उजव्या कालव्यातून ५१.६१ क्युसेसने रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. दुपारी ४ नंतर उजव्या कालव्यातून पाण्याचा प्रवाह वाढवण्यात आला आहे.

हे आवर्तन तब्बल सत्तावीस दिवस सुरू राहणार असुन आवर्तन ‘टेल टू हेड’ दिले जाणार असल्याची माहिती, कार्यकारी अभियंता प्रविण घोरपडे, सिना मध्यम प्रकल्प उपविभागीय अभियंता संदीपकुमार शेळके यांनी दिली आहे. कर्जत तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निमगाव गांगर्डा येथील सिना धरणामधून सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे रब्बी हंगामामधील शेतातील उभे असलेले पिके व जनावरांच्या चा-यासह फळबागांना जीवदान मिळणार आहे.

तर शेती सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ऐन मोक्याच्या वेळी पाण्याची गरज भासत असता आवर्तन सुटल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. यंदा सिना धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभक्षेत्रातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याकरिता योग्य नियोजनातून आवर्तने मिळणार आहेत.

सिना धरणाची पाणी साठवण क्षमता २४०० दलघफू असून सध्या धरणातील पाण्याची स्थिती एकूण साठा १७६९.९१ (द.ल.घ.फु), उपयुक्त साठा १२१७.२३ (द.ल.घ.फु.), उपयुक्त टक्के ६५.८८ %, एकूण ७३.७३ % टक्के अशी आहे..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe