कोविड सेंटर राजकीय पक्षाने ताब्यात घेण्याचा प्रकार म्हणजे आयत्या बिळावर नागोबा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  नगर शहरात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. हॉटेल नटराजमध्ये सामाजिक संस्थांचे साहाय्य घेऊन मोठ्या सुविधा उभ्या केल्या, पण आता भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे.

केवळ नावासाठी नटराज कोविड सेंटर राजकीय पक्षाने ताब्यात घेण्याचा प्रकार म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहे, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी शनिवारी केली.

हाॅटेल नटराजचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकली आहे. महावितरणने वीज कनेक्शन कट केले आहे. मग या इमारतीला वीज व पाणी आले कोठून? मनपाने ही इमारत ताब्यात घेऊन सुशोभीकरणासाठी मोठा खर्च केला असेल,

तर ही सुविधा आपण देत आहोत एवढे सांगण्यासाठी महापौर आणि शहरप्रमुखांनी हा प्रकार केला का, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. कोरोना काळात भाजप नेत्यांसह महापौर ६ महिने घरीच होते.

मार्च, एप्रिल, मेमध्ये शिवसेनेने अन्नछत्र चालवले. त्यावेळी भाजपचे हे नेते कोठे होते. आता परिस्थिती हाताबाहेर जात असताना मनपाने हे १०० बेडचे

जम्बो कोविड सेंटर सुरु केले आहे. मनपाने हे कोविड सेंटर चालवण्यास देण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले होते. त्याचे काय झाले? असा टोलाही जाधव यांनी लगावला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment