अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Crime :-विहिरीपासून थोडा लांब बोर घ्या. असे म्हणाल्याचा राग आल्याने दत्तू गाडे व त्यांच्या कुटुंबीयांना लाकडी दांड्याने मारहाण व कुऱ्हाडीने वार केल्याची
राहुरी तालूक्यातील मोमीन आखाडा येथे घडली असून याप्रकरणी गुरुवार दि 17 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिस ठाण्यात चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१६ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास यातील दत्तू गवराज गाडे हे मोमीन आखाडा येथील त्यांच्या घरासमोर होते. त्यावेळी ते आरोपींना म्हणाले कि, माझ्या विहिरीपासून तूमचा बोर थोडा लांब घ्या.
याचा आरोपींना राग आला. त्यावेळी त्यांनी दत्तू गाडे व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत दत्तू गवराज गाडे, ज्ञानदेव दत्तू गाडे, भारत दत्तू गाडे, रेखा दत्तू गाडे, सुरेखा ज्ञानदेव गाडे हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दत्तू गवराज गाडे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विठ्ठल मनाजी भांड, महेंद्र विठ्ठल भांड, संदीप विठ्ठल भांड,
शकूंतला विठ्ठल भांड सर्व राहणार बारागांव नांदूर, बोरटेक वस्ती, ता. राहुरी. या चार जणांवर जबर मारहाण व जिवे मारण्याची नमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय