Ahmednagar News : तालुक्यातील बेलापूर जवळून मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान, एका महिलेने लहान मुलाला पळवून नेल्याची घटना घडली असून बेलापूर पोलिसांनी तातडीने सदर महिलेला मुलासह ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूर – श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गायकवाड वस्ती येथून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शाबीरा इब्राहीम शेख यांचा दोन वर्ष वयाचा नातु परवेज सलीम शेख यास पळवून नेण्यात आले होते.
सदर महिलेचा फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सदर महिलेचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना बेलापूर पोलिसांना दिल्या होत्या.
दोन वर्ष वयाच्या मुलाला पळवुन घेवुन जात असताना देवळाली प्रवरा येथील काही नागरीकांनी त्या महिलेला पाहिले. त्यांनी तातडीने बेलापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
बेलापूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संपत बड़े व भारत तमनर तातडीने देवळाली प्रवरा येथे गेले तेथुन मुलासह पळवून नेणाऱ्या महिलेस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. सबंधीत मुलगा परवेज यास आजीच्या ताब्यात देण्यात आले आहे. लहान मुलास पळवुन नेणाऱ्या महिलेस फरार होण्या आगोदरच पोलिसांनी पकडले.