सकाळी फिरण्यास गेलेल्या महिलेस अज्ञात वाहनाने दिली धडक, महिलेचा जागीच मृत्यू …….

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  बुऱ्हाणनगर-वारुळवाडी रस्त्यावर सकाळी फिरण्यास गेलेल्या महिलेस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली आहे.

या संदर्भात त्यांची मुलगी रोहिणी वसंत वाघ यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वारुळवाडी रस्त्यावर गयाबाई वसंत वाघ (वय 54, रा. गुगळे कॉलनी, बुऱ्हाणनगर) या सकाळी फिरण्यासाठी गेल्या होत्या.

सोपान कर्डिले यांच्या घरासमोरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेतील वाहनचालक हा अपघातानंतर वाहनासह पळून गेला आहे.

या संदर्भात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक साठे हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!