महिला करत होती हातभट्टी दारूची निर्मिती; पोलिसांनी टाकला छापा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत महिलेकडून गावठी हातभट्टी दारू निर्मिती केली जात होती. या हातभट्टी अड्ड्यावर नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाने छापा टाकला.

गावठी दारू, 750 लीटर रसायन असा 30 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कमलाबाई गोवर्धन पवार (वय 55 रा. कापुरवाडी ता. नगर) हिच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कापुरवाडी शिवारातील गोपाळ वस्ती, मोरेमळा येथे कमलाबाई पवार ही महिला गावठी हातभट्टी दारूची निर्मिती करत असल्याची माहिती उपअधीक्षक कातकडे यांना मिळाली होती.

त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी कापुरवाडी शिवारात सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकला. तेथे तयार हातभट्टी दारू व कच्चे रसायनाचा साठा जप्त केला असून हातभट्टी दारू निर्मिती करणारी महिला कमलाबाई पवार हिच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe