Ahmednagar Politics : यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. श्री. फडणवीस म्हणाले, विकासाची विविध कामे करत असताना वैविध्यपूर्णरितीने संस्कृती, परंपरा व इतिहास जपला असेल तर त्यासारखी दुसरी आनंदाची बाब नसते.
या उड्डाणपूलाचे काम करतांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उड्डाणपुलाच्या ८५ खांबांवर शिवचरित्र चित्ररूपात साकारण्याची संकल्पना मांडली. यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यातील ३५ खाबांवर शिवचरित्र साकार ही झाले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकट्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणखी १७ हजार कोटीची कामे रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून प्रस्तावित केली आहेत. महाराष्ट्र शासन सुध्दा पायाभूत सुविधांसाठी कामे करत आहे. भविष्यात निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे.
सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा सोहळा – महसूलमंत्री विखे -पाटील यावेळी महसूल मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, या उड्डाणपुलाच्या उभारणीत दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी, दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
त्याबरोबर मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर महानगरपालिकेला या ‘युटिलिटी कॉम्प्लेक्स’ उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून ५० कोटी रुपये दिले होते. त्यामुळे त्यांचे ही या उड्डाणपुलाच्या उभारणीत अमूल्य योगदान आहे.
खासदार डॉ.सुजय विखे-पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपूल उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा आजचा लोकार्पण सोहळा आहे, असे ते म्हाणाले.