तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू,बहीण म्हणाली दादा मी आणलेली राखी आता कोणाला बांधू?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- विहिरीत डोकावताना पाय घसरून पडल्याने अक्षय रवींद्र ढूस (२२) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजता टाकळीमिया शिवारात करपेवस्तीवर घडली.

अक्षय आईला घेऊन टाकळीमिया येथे मावशीकडे गेला होता. विहिरीत पोहणाऱ्या भावंडांकडे डोकावून पाहताना अक्षयचा तोल गेला. इतर सर्व अक्षयला वाचवू शकले नाहीत.

दुपारची वेळ असल्याने करपे यांच्या विहिरीत चार,पाच मुले पोहत होती. तेथेच त्याचा तोल जाऊन पाय घसरून मृत्यू झाला. तो खाली गेल्यानंतर वर न आल्याने मित्र घाबरून गेले.

त्यांनी ही घटना घरच्यांना सांगताच एकच आक्रोश सुरू झाला. देवळाली प्रवरा येथील पोहणारे ताराचंद गोलवड, तुकाराम चव्हाण, विजू पवार, विशाल बर्डे, गिरीश कदम यांना पाचारण करण्यात आले.

विहिरीत जास्त गाळ असल्याने त्यांच्या कामात व्यत्यय येत होता.पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर अक्षयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अक्षयची बहीण डॉ. कोमल ही नगरहून आली. तिने, दादा मी आणलेली राखी आता उद्या कोणाला बांधू? असे म्हणून आक्रोश सुरू केला.

परिवाराचा आक्रोश बघून उपस्थितांची मने हेलावून गेली. मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठविण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रवींद्र ढूस यांना अक्षय व डॉ. कोमल असे दोन अपत्य होते. . अक्षयच्या मागे एक बहीण, आई-वडील असा परिवार आहे. रात्री उशिरा अक्षयच्या मृतदेहावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment