अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- संगमनेरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस वसाहतीत आठ दिवसांपूर्वी जप्त करून लावलेला वाळूचा ट्रॅक्टर ट्रोलीसह चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे.
वाळू तस्कर वाहन परस्पर घेऊन जातात अशा घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. या प्रकारामुळे संगमनेर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसून त्याची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर ट्रोलीसह व त्यात एक ब्रास वाळू आढळून आल्याने महसूल विभागाने जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून तो पोलीस वसाहतीत लावण्यात आला होता.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी हा ट्रॅक्टर तेथून चोरून नेला. याप्रकरणी तलाठी पोमल दत्तात्रय तोरणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल टोपले हे करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम