Ahmednagar News : पाथर्डी तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयात खाजगी व्यक्ती बसु देवु नये, यासाठी मी तिन वर्षे लढा दिला आहे. तहसीलदार पाथर्डी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मी लेखी तक्रारी केल्या आहेत.
माझ्या तक्रारीची दखल घेतली असती तर पाथर्डीच्या रेशदुकानदारांची झालेली झालेली लाखो रुपयांची फसवणुक टाळता आली असती. आता दोषी असलेल्या पुरवठा शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करावी. अशी मागणी वंचीतचे अरविंद सोनटक्के यांनी प्रांतअधिकारी प्रसाद मते यांच्याकडे केली आहे.
तालुका पुरवठा शाखेतील अनागोंदी कारभारामुळे महसूल विभागाची नाचक्की झाली आहे. खाजगी व्यक्तीकडे रेशन दुकानदारांना लाखो रुपये देण्याचे महसूलच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
खाजगी माणुस अधिकृतपणे कार्यालयात कसा बसत होता. तो दुकानदार व अधिकाऱ्यांना सुचना कशा करत होता. पुरवठा शाखेतील अधिकारी व खाजगी व्यक्ती यांचे संगनमत होते.
त्यांची चौकशी करावी व तातडीने कारवाई करावी. मी तिन वर्षापासुन पाच वेळा आंदोलन केलेले आहे. पत्रव्यवहार केलेला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी माझ्या तक्रारीची चौकशी करण्याऐवजी पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घातले. त्यामुळेच हा घोटाळा झाला आहे.
संबंधितांवर कारवाई करा अन्यथा प्रांतअधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सोनटक्के यांनी दिला आहे. पाथर्डी पुरवठा अधिकारी कार्यालयातील या घोटाळ्यात नेमके कोण कोण अडकले आहेत.
याची देखील चौकशी झाली पाहीजे. अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी मागणी सोनटक्के यांनी केली आहे.