अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- येत्या सहा महिन्यात कोणत्याही परिस्थितीत कल्याण- विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ (६१) या रस्त्याचे काम सर्व अडथळे दूर करत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल.(MP Dr. Sujay Vikhe)
भूसंपादनाचा मोबदला तातडीने देत व इतर तांत्रिक अडचणी दूर करुन हा रस्ता पूर्ण केला जाईल. यानंतर या महामार्गासाठी अतिरिक्त वाढीव दहा कोटींचा निधी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडून उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. मोबदला दिल्यानंतर अडवणूक केली,

तर मात्र नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावी लागतील. तांत्रिक अडचण व इतर सबब खपवून घेतली जाणार नाही. ठेकेदार, अधिकारी यांच्या सहकार्याने आहे. तोच रस्ता चांगल्या पद्धतीने पूर्ण केला जाईल. वृक्षारोपण व इतर कामे ही नंतर केल्या जातील, असा विश्वास विखे यांनी दिला.
पाथर्डीतील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत विखे यांनी ही माहिती दिली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, नगरसेवक रमेश गोरे, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, अजय रक्ताटे, प्रतिक खेडकर, दत्ता बड़े, काशिनाथ लवांडे,
अंकुश चितळे व अधिकारी उपस्थित होते. डॉ. सुजय विखे यांनी मंगळवारी या रस्त्याची मेहेकरीपासून विविध ठिकाणी थांबून पाहणी करुन अडचणी समजून घेत त्या तातडीने सोडवण्यासाठी आदेश दिले. अनेक दिवसांपासून या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे.
विविध ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे अनेक अपघात होऊन अनेकांचे जीव गेले. मेहेकरी फाटा ते फुंदे टाकळी पर्यंतच्या ५५ किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे, खोदकाम, पुलाची कामे अर्धवट पडली आहेत. अनेक आंदोलने झाली. विखे यांनी ही निवडणूक काळात या महामार्गाचे आश्वासन दिले होते.
ते काम अपूर्ण राहिल्याची खंत व्यक्त करत दिलगीरी व्यक्त केली. नगरमधील उड्डाणपूल, कोरोना व इतर कारणास्तव दिरंगाई झाल्याचे मान्य करत डॉ. विखे म्हणाले, यापूर्वीचा मंजूर ६८ कोटींचा निधी पूर्ण खर्च झाल्याशिवाय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेले दहा कोटी रुपये मिळणार नाही. त्यामुळे आहे तो रस्ता पूर्ण करू.
या प्रक्रियेत व आतापर्यंत आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याचे विखे म्हणाले. सर्वांचे त्यांनी आभार मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम