कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी पोलीस ठाण्याची होतेय मागणी

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील तिसगाव व बोधेगाव येथे दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर करण्याच्या मागणीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हंटले आहे कि, शेवगाव व पाथर्डी हे मराठवाड्याच्या हद्दीवर असलेले दोन मोठे तालुके आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पोलिस यंत्रणेवर फार ताण पडतो व तिसगाव व बोधेगाव येथे कोणत्याही प्रकारची घटना घडली असता

नागरिकांना पोलिस ठाण्यात जाण्यासाठी लांब जावे लागते. त्यामुळे या गावातच पोलीस ठाणे झाले तर गावकऱ्यांना सोपे होणार तसेच येथे पोलीस स्टेशन नसल्याने गुन्हेगारांची संख्या वाढली आहे.

कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी येथे दोन नवीन पोलीस ठाणे मंजूर करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस शाहनवाज खान समवेत आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उपाध्यक्ष संदीप वर्पे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe