सभासदांनो घाबरु नका ! शहर सहकारी बँकेचे कुठलेही आर्थिक नुकसान नाही बँक भक्कम स्थितीत उभी

Published on -

Ahmednagar News:अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या खातेदार, ठेवीदार, कर्जदार व तमाम सभासद बंधूनो, आपण सध्या चालू असलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला अजिबात घाबरुन जाऊ नका किंवा गोंधळून जाऊ नका,

कोणीही आपणास खोटे-नाटे बँकेबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपण शांतपणे विचार करा की, सध्या घडलेल्या सोनेतारण प्रकरणात झालेल्या अफरातफरी या पोलिसांच्या सहकार्याने व बँक वरिष्ठ अधिकार्‍यांचे सतर्कतेने उघडकीस येऊन गोल्ड व्हॅल्युअरसह इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सदर प्रकरणात पोलिस कारवाईसह बँकेची या प्रकरणातील रकमेची वसुली देखील होत आहे.

गोल्ड व्हॅल्युअरचा बँकेशी असलेल्या कायदेशीर करारानुसार नुकसानीची रक्कम त्याला बँकेत भरावी लागते, त्यामुळे बँकेची कुठलीही आर्थिक नुकसान होत नसते व होणार नाही, असा खुलास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन चितळे यांनी केला.

यापूर्वीही बँकेवर अशा प्रकारचे संकटे आणली गेली आहेत. परंतु आपल्या सभासदांचे पाठबळावर व आशिर्वादाने केवळ बँकेची खोटी बदनामी सोडून आजतगायत एक रुपयांचेही आर्थिक नुकसान झालेले नाही व भविष्यातही आम्ही होऊ देणारच नाही.

आपल्या बँकेची वार्षिक, आर्थिक उलाढाल ही 27 हजार ते 30 हजार कोटीपर्यंत असून, सर्व निकष उत्तम आहेत. केवळ थकबाकी हा मुद्दा थोडासा होता आता 2 ते 3 वर्षानंतर कोर्ट कामकाज नियमितपणे व सुरळीतपणे चालू झाल्याने तोही प्रश्न आम्ही सर्व मिळून निश्चितपणे सोडवून आपल्या बँकेस पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणारच आहोत,

म्हणून विनंती की, कोणी काहीही खरे खोटे सांगून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील, तर त्यांची अजिबात दखल घेऊ नये, अशी कळकळीची विनंती ज्येष्ठ संचालक सीए गिरिश घैसास व अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News