Ahmednagar News : दारूवरून वाद झाला, डोक्यात दांडके टाकून निर्घृण खून केला..एमएडीसीतील मर्डरचा 24 तासात उलगडा

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : एमआयडीसी परिसरात एका परप्रांतीय इसमाची निर्जनस्थळी नेऊन त्याचा निघृण खून करणार्‍या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वास नामदेव गायकवाड (रा. श्रीस्टाईल चौक, एमआयडीसी नगर),

अक्षय उर्फ शंभो प्रकाश सकट (वय-23 रा. पिंपळगाव कौडा ता. जि. नगर), राहुल अशोक धोत्रे (वय-26 रा बजाजनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

विश्वास गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल आहेत. तर धोत्रेवर 5 गुन्हे दाखल आहेत.

एमआयडीसी हद्दीत गेल्या दोन दिवसापूर्वी ओमप्रकाश राबचना महतो (वय-35) यांचा प्लॉट नंबर एफ 71 मध्ये मृतदेह आढळून आला होता. याबाबत त्यांच्या पत्नीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली. गुन्ह्याचा तपास करत असता पो.नि. सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा विश्वास गायकवाड याने केला असून हा औरंगाबद कडून नगरच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस ताब्यात घेण्याच्या पथकास सूचना पथकाने आरोपीस हॉटेल इंद्रायणी कडुन तपोवन रोडकडे येत असतांना पडक्या महालाजवळ सापळा रचून ताब्यात घेतले.

ही कारवाई सपोनी राजेंद्र सानप यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस नंदकुमार सांगळे, नितीन उगलमुगले, साबीर शेख, विष्णु भागवत, राजु सुद्रिक, महेश बोरुडे, संतोष नेहुल, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, सचिन हरदास, मोबाईल सेल अहमदनगरचे राहुल गुंड्डु, नितीन शिंदे, ज्योती काळे यांच्या पथकाने केली.

दारू वरून वाद व डोक्यात दांडके मारुन केले ठार

ओमप्रकाश राबचना महतो याच्या सोबत दारु पिऊन भांडणे झाले होते. त्यावरून त्यांना एमआयडीसीतील फ्लॅट. एफ क्र 71 मध्ये घेवून जाऊन त्याचे डोक्यात लाकडी दांडके मारुन त्याला जिवंत ठार मारले अशी कबुली तपासात आरोपींनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe