विदेशातून प्रवास करून श्रीरामपुरात आलेल्या त्या व्यक्तींचे रिपोर्ट आले…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :-  सध्या ओमायक्रॉनच्या विषाणूने जगभरात थैमान घातले असून परदेशातून भारतात येणार्‍यांचा शोध घेवून त्यांची तपासणी केली जात आहे.

यातच श्रीरामपूर येथे दुबई, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या ठिकाणाहून आलेल्या आणखी दहा जणांची नुकतीच तपासणी करण्यात आली आहे.

या अगोदर दुबई येथून आलेल्या चौघांचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.

श्रीरामपुरात 29 नोव्हेंबर 2021 रोजी दुबईहून-मुंबई व मुंबईहून श्रीरामपुरातील वॉर्ड नं. 6 मधील एकाच कुटुंबातील चौघेजण श्रीरामपुरात आले.

त्यांचा शोध घेवून तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली. त्यांच्या आरटीपीसीआरच्या तपासण्या झाल्या असून सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

बुधवारी पुन्हा परदेशातून आलेल्या लोकांचा वैद्यकीय विभागातील पथकाने शोध घेतला असता 10 जण आढळून आले आहेत. यात ऑस्ट्रेलिया

येथून एकाच कुटुंबातील वॉर्ड नं. 7 मधील चौघेजण आले असून वॉर्ड नं. 3 मध्ये अमेरिकेतून एकजण आलेला असून अन्य 5 जण हे वॉर्ड नं. 1 मध्ये आलेले आहेत.

या सर्वांची तपासणी केली. त्यांच्या आरटीपीसीआरच्या तपासण्या झाल्या असून त्यांचे अहवाल आज येण्याची शक्यता आहे. दरम्यान ओमायक्रॉनचे

काही रुग्ण महाराष्ट्रातही आढळून आले असून नगर जिल्ह्यातही शिरकाव होण्याची भिती निर्माण झाल्याने बाहेर देशातून आलेल्यांचा शोध घेवून त्यांची तपासणी करण्याचे काम सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe