म्हणून ‘त्या’ कृषी सेवा केंद्र चालकावर केला गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- डाळिंब पिकासाठी शेतकऱ्यांना दिलेले बायोसुल हे औषध बनावट आढळून आल्याने कर्जत तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक व औषध विक्रीसाठी उपलब्ध करून देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime)

याप्रकरणी कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी कृषी विभागाकडे तक्रार देऊन त्याचा पाठपुरावा केला होता.

तपासातून सर्व बनावटगिरी उघड झाल्याने कर्जत पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, बायोसुल नावाचे बनावट औषध पुरविणारे आणि विकणारे नंदराज अहिरे,

यश ॲग्रो कन्सल्टन्सी, मिरजगाव तसेच हे औषध त्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देणारे लक्ष्मीकांत हुमे दोघेही रा. मिरजगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांनी विकलेल्या बायोसुल या बनावट औषधाच्या डाळिंब पिकावरील फवारणीमुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली होती. यातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe