Kalyan-Visakhapatnam National Highway । अहमदनगर जिल्ह्यातील ह्या २७ शेतकऱ्यांना मिळणार ४ कोटी २६ लाखांचा मोबदला

Ahmednagar News:अहमदनगर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ५८ लाख रुपये ! खासदार सुजय विखे म्हणाले…

शहरातून जाऊन पुढे पाथर्डी तालुक्यांतून जाणाऱ्या कल्याण -विशाखापटनम या राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेल्या या तालुक्यातील ७ गावांतील २७ शेतकऱ्यांना ४ कोटी २६ लाखांचा जमिनीचा मोबदला मिळणार आहे.

बुधवारी १७ऑगस्ट पर्यंत २७ शेतकऱ्यांपैकी १० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ५८ लाख २१ हजार २८६ रुपयांचा मोबदला जमा करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.

डॉ. विखे म्हणाले, २०१७ पासून या मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित होता. पाथर्डी तालुक्यातून जात असलेल्या कल्याण -विशाखापटनम या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ साठी या तालुक्यातील सात गावांमधील २७ शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी, देवराई, माळीबाभूळगाव निवडूंगे, शेकटे, वाळूंज करंजी या सात गावांमधून कल्याण-विशाखापटनम हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे.

या महामार्गासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने २७ शेतकऱ्यांची एकूण १५ हजार ७२८ चौरस मीटर क्षेत्र संपादित केले होते. राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादित होऊनही शेतकऱ्यांना मात्र मोबदला मिळाला नव्हता.

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

अखेर या पाठपुराव्याला यश आले असून, दि. १७ ऑगस्टपर्यंत २७ शेतकऱ्यांपैकी १० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १ कोटी ५८ लाख २१ हजार २८६ रुपयांचा मोबदला जमा केला आहे, असे विखे यांनी सांगितले.

उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम कागदपत्राची पूर्तता झाल्याबरोबर बँक खात्यात वर्ग होणार असल्याचे ते म्हणाले. अहमदनगर शहराजवळून कल्याण विशाखापटनम हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे.

पुढे पाथर्डी तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी ते मेहेकरी असे ५२ किलोमीटर लांबीचे अंतर या तालुक्यात असणार आहे. पाथर्डी तालुक्यापासून पुढे बीड मार्गे विशाखापटनमकडे हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe