अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्र राज्य सरकारने वाईन सुपर मार्केटमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने वाईन बाबत जो निर्णय घेतला आहे तो शेतकर्यांच्या फायद्यासाठी घेतलेला आहे.
असे प्रतिपादन कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. आज जामखेड तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार रोहित पवारांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी द्राक्ष व इतर पिकांची जोड द्यावी द्राक्ष मध्ये जास्त प्रमाणात वाईन असते. म्हणूनच सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असावा असे वाटते.
दरम्यान वाईन सुपरमार्केटमध्ये विक्री वर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. याविषयी आज आमदार रोहित पवारांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने हे धोरण घेतले आहे.
आणखीही चांगले धोरण आखण्याची गरज आहे असेही सांगितले. आता किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या ठिकाणी म्हणजेच सुपर मार्केटमध्ये सुद्धा वाईन विक्री केली जाणार आहे. पण त्यासाठी किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटापेक्षा मोठं असलं पाहिजे ही अट घालण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम