मच्छर मारायला आले अन भरदिवसा घर साफ करून गेले …!

Published on -

Ahmednagar News: आम्ही महापालिकेचे कर्मचारी आहोत.तुमच्या घराभोवती मच्छर खूप झालेले आहेत. त्यासाठी तुमच्या घराची सफाई करण्यासाठी आलो.

असा बनाव करून चार-पाच चोरट्यांनी घरातील आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना केडगाव उपनगरात घडली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी, रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झालेले विश्‍वनाथ एकनाथ राजगुरू हे केडगावातील अमितनगर भागात राहतात ‘आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत.

तुमच्या घराभोवती खूप मच्छर झालेले आहेत. आम्हाला या भागाची फवारणी करायची आहे,’ असे सांगून त्यांनी फवारणीचा बनाव केला.

काहींनी घरात घुसून सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये चार तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याची चेन, प्रत्येकी अर्धा ग्रॅमच्या दोन अंगठ्या, एक तोळ्याचे कानातील झुमके, अर्धा ग्रॅमच्या कानातील पळ्या असे एकुण आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून हे चोरटे साडेअकरा वाजता घरातून निघून गेले.

राजगुरू यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात ही चोरी झाल्याचे सायंकाळी लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चार-पाच चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe