‘ते’ हिंद सेवा मंडळाला अडचणीत आणणारे सभासद ! भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडे…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : हिंद सेवा मंडळाचे सभासद दीप चव्हाण, वसंत लोढा, संजय घुले, अनिल गट्टाणी व हेमंत मुळे हे मंडळाला अडचणीत आणण्यासाठी काम करणारे सभासद आहेत. गेल्या १०० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या हिंद सेवा मंडळावर खोटे आरोप करीत बदनाम करीत आहेत.

त्यांनी संस्थेच्या चेंज रिपोर्टबाबत केलेला आरोप चुकीचा असून, अद्याप तो न्यायप्रविष्ट आहे. हिंद सेवा मंडळाची झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मात्र, उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकेत हस्तक्षेप न करण्याचा निकाल दिल्याने मंडळाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाल्यानेच संस्थेची बिनविरोध निवडणूक झाली आहे.

हिंद सेवा मंडळावर आरोप करणाऱ्या पाचही जणांचा उद्देश संस्थेचा कारभार विस्कळीत करण्याचा आहे. संस्थेची विद्यार्थी गृहाची जागा ही वक्फ बोर्डाची असल्याचे सांगत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रत्यक्षात वक्फ बोर्डाचा व त्या जागेचा काही एक संबंध नाही. वसंत लोढा हे सदर जागा वक्फ बोर्डाच्या घशात घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हिंद सेवा मंडळाच्या शहरात असलेल्या ५ ते ६ जागांवर ताबेमारी झालेली आहे.

वसंत लोढा यांनी पुढाकार घेऊन ही ताबेमारी दूर करून संस्थेला त्या जागा पुन्हा मिळवून द्याव्यात. शहरातील ताबेमारी कमी करण्याच्या कामास त्यांनी येथून सुरुवात करावी, असेही आवाहन फडणीस यांनी पत्रकार परिषदेत केले.

एकीकडे भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार व खासदार वक्फ कायदा रद्द करण्यासाठी प्रयत्नशील असताना भाजपाचे नेते वसंत लोढा हे वक्फ बार्डाचे एजंट म्हणून काम करतात, हा मोठा विपर्यास आहे.

याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडे रितसर तक्रार करणार आहे. दीप चव्हाण, वसंत लोढा, संजय घुले, अनिल गट्टाणी व हेमंत मुळे यांनी वैयक्तिक माझ्यावर मोठ्या प्रमाणात खोटे आरोप केले आहेत. त्यांनी ते सिद्ध करावे, असे आव्हान त्यांनी केले.

त्यांनी केलेल्या बदनामीच्या विरोधात मी त्यांच्यावर प्रत्येकी ५० लाखाचा अनु नुकसानीचा दावा करीत आहे, असे अॅड. फडणीस म्हणाले. यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य सुमतीलाल कोठारी, जगदीश झालानी, ज्योती कुलकर्णी, रणजित श्रीगोड, बी. यू. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe