‘त्यांनी’ पंचवीस वर्षे फक्त कामांची जाहिरातबाजी केली…?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Politics :- गावातील मुख्य रस्ते डांबरीकरण करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आवश्यक रस्ते बनवणे गरजेचे आहेत. परंतु त्यांनी कोणतेही काम न करता पंचवीस वर्षे फक्त कामांची जाहिरातबाजी केली.

अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केली. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की,आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे रस्ते होणे गरजेचे आहे.

शेतमाल बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांच्या कांदा चाळ, शेतापर्यंत वाहन जाण्यासाठी रस्ते करणे गरजेचे आहे. मात्र असे रस्ते केले नाहीत. परिणामी रस्त्यांअभावी शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करण्यात येत आहे. यापूर्वी २५ वर्षे फक्त विकास कामांची जाहिरातबाजी करून बिले काढले की काय, असा प्रश्न गाडे यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe