अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये नेहमीच आरोप – प्रत्यारोप होत असते. यातच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच एका वक्तव्यावरून भाजपचे न्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणखी एका नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु अशा नेत्यांची आता किव येत आहे, काही जणांनी मोठ्या आशेने त्यांनी भाजपात प्रवेश केला ,
शपथविधीचे स्वप्न पाहत होते, नवीन कपडेही शिवत होते, आज सरकार पडेल, उद्या सरकार पडले असे त्यांना वाटत होते, परंतु तसे होत नसल्याने त्यांच्यात नैराश्य आलेले आहे.
त्यामुळेच असे बेताल वक्तव्य केले जात असल्याची टिका मंत्री थोरात यांनी केली. तसेच पुढे बोलताना थोरात म्हणाले कि, अशा नेत्यांनी उद्या रस्त्यावर उतरुन लोकांना दगड मारले नाही, म्हणजे बर होईल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राज्यात किमान समान कार्यक्रमाअंतर्गत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे भाजपला ज्या ज्या पातळीवरुन दुर ठेवायचे असेल त्यानुसार ते ते निर्णय घेतले जातील असा विश्वास राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
तसेच राज्यातील ईडी प्रकरणावरून थोरात म्हणाले, ईडी, सीआयडी या यंत्रणा पूर्वी माहित नव्हत्या, आता लहान मुलांनासुध्दा ईडी समजायला लागली आहे,
या यंत्रणा राष्ट्रीय पातळीवरील असून विघातक प्रवृत्तींना आळा बसविण्यासाठी असाव्यात. मात्र त्या आता राजकारणासाठी वापरल्या जात असल्याने त्याचे दुष्परीणाम हे निश्चितच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम