अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- भाजपाला सुरुवाती पासून आपल्या पराभवाचा अंदाज आला होता, त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले होते,
मात्र जनतेने त्याच्या खोट्या प्रचाराला थारा दिला नाही व आम्ही जे विकासाचे स्वप्न पाहिले आहे त्यावर कर्जतकरांनी विश्वास दाखवला असे प्रतिपादन आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले.
कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवार यांनी भाजपाच्या ताब्यात असलेली आमदारकी प्रथमतः प्रा राम शिंदे यांच्या कडून हिसकावून घेतली
त्यानंतरच्या काळात भाजपातील एक एक व्यक्ती हेरून त्यांना आपलेसे केले तर आता भाजपाच्या ताब्यातील नगर पंचायत ही हिरावून घेत भाजपला व प्रा.राम शिंदे यांना जोरदार धक्का दिला.
या यशानंतर आ.रोहित पवार यांचे कर्जत मध्ये आगमन झाले. त्यांनी विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्याबरोबर ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी आ.रोहित पवार यांनी बोलताना म्हटले की, आम्ही जनते समोर आगामी काळात काळात करावयाच्या विकासाचे चित्र मांडले ते जनतेला भावले विरोधकांनी मात्र चुकीच्या पद्धतीने प्रचार करून जनतेला भुलविण्याचा प्रयत्न केला मात्र जनता ही सुज्ञ असते हे त्यांच्या लक्षात आले असेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम