अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी वर्गाचे थकीत वेतन त्वरीत आदा करण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने शुक्रवार दि.९ रोजी राज्यभर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.
कोरोना काळाची दक्षता घेत कामगार संघटनेचे मोजके पदाधिकारी नगर येथील विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या समोर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव ज्ञानदेव अकोलकर यांनी दिली.
अकोलकर म्हणाले, सचोटीने सेवा करणारे एसटी कर्मचारी पगार थकल्याने आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. एसटी कामगारांच्या या समस्येकडे लक्ष वेधीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे.
सरकार व महामंडळाच्या अधिकाऱ्यांना एसटी या प्रश्नाचे गांभिर्य कळावे, म्हणून सविनय पध्दतीने आम्ही आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत. कोरोना काळातील निर्देश व सूचनांचे पालन करीत विभाग नियंत्रक कार्यालया समोर मोजक्या संख्येने हे आंदोलन होणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved