अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- मागील आठवड्यात चोरट्यांनी नगर तालुक्यातील देऊळगाव सिध्दी, रूईछत्तीशी, राळेगण म्हसोबा, बायजाबाई जेऊर, रतडगाव, चास शिवारात चोरी, घरफोड्या केल्या. यामध्ये लाखो रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. दरम्यान तालुक्यात चोर्या, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असली तरी त्या गुन्ह्यांची उकल करण्यात आम्हाला यश आले असल्याचे नगर तालुका पोलिसांचे म्हणणे आहे.
दररोज होणार्या चोर्या, घरफोडीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या 15 दिवसांपासून चोर्या, घरफोड्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकी, मोबाईल, शेतामधील सौरपंप, वीज मोटार, पाळीव जनावरे यासह घरफोडी करून रोख रक्कम, सोन्याचे दागिणे चोरीला जाण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहे.
यामुळे नगर तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
घरफोडीच्या घटनांपेक्षा दुचाकी, सौरपंप, विद्युत मोटार व इतर शेती साहित्य, पाळीव जनावरे चोरण्याकडे चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
अशा चोर्या करण्याच्या ठराविक टोळ्या नगर तालुक्यात सक्रिय असण्याची शक्यता आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त झाल्यानंतरच चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे.
शेती उपयोगी साहित्यांची चोरी होत असल्याने शेतकर्यांना अडचणींचा समाना करावा लागत आहे. दरम्यान नगर तालुक्यातील अनेक गावात चोर्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले असले तरी त्याची उकल करण्यात आम्हाला यश आले आहे.
चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न आमच्या पातळीवर सुरू असल्याची प्रतिक्रीया नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.