शहरातील ‘या’ कॉलेजजवळील गॅरेजवर चोरट्यांचा डल्ला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   नगर शहरातील अहमदनगर महाविद्यालयजवळ ऑटो गॅरेजमध्ये चोरीची घटना घडली. कोतवाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी तीन आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमनाथ सुभाष रानमळ (वय 35, रा. नागरदेवळे, ता. नगर) यांचे अहमदनगर महाविद्यालयाशेजारी सुभाष ऑटो केअर नावाचे दुकान आहे.

चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दुकानातील लोखंडी लोडर, 14 इंची नांगर असा 27 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरला होता. याप्रकणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe