फॅब्रिकेटिंगच्या दुकानासमोर उभा केलेला ट्रक चोरट्यांनी पळविला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  फॅब्रिकेटिंगच्या दुकानासमोर उभा केलेला टाटा कंपनीचा पांढर्‍या रंगाचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना निंबळक बायपास शिवारात घडली.

याप्रकरणी संजय भीमा चौधरी (वय 36 रा. निंबळक ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा फॅब्रिकेटिंगचा व्यवसाय आहे. निंबळक बायपास नजिक त्यांचे शुभम फॅब्रिकेटिंग नावाचे दुकान आहे.

त्यासमोर असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी त्यांचा दीड लाख रुपये किंमतीचा ट्रक उभा केलेला होता. कोणीतरी अज्ञात चोरट्याने तो चोरून नेला.

याप्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन गायकवाड हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe